Breaking News
Home / बातम्या / तरुणीने मारली प्रभासच्या गालावर चापट, व्हिडीओ झाला वायरल

तरुणीने मारली प्रभासच्या गालावर चापट, व्हिडीओ झाला वायरल

मोठ्या लोकांना भेटून सेल्फी काढायला अनेकांना आवडते आता तर तो ट्रेंड झाला आहे. अनेकांना आपण काय करत आहोत याचे भान देखील उत्साहामध्ये होत नाही. अतिउत्साहात वाईट कृत्य देखील घडून जात असच घडलं आहे बॉलिवूड आणि साऊथचा चा सुपरस्टार अभिनेता प्रभास सोबत. प्रभासच्या गालावर एका तरुणी फॅन ने चापट मारली आहे. त्याचा व्हिडीओ देखील वायरल होत आहे, हा प्रकार विमानतळावर घडला आहे. तरुणीने असे केल्यामुळे प्रभास देखील सुरुवातीला भारावून गेला होता आणि त्याने गालावर हात लावला.विमानतळावर प्रभात पोहचला आणि विमानतळावरील सर्व गर्दीच्या समोर प्रभासला गालावर चापट खावी लागली. एका अतिउत्साही तरुणीने प्रभास दिसल्या क्षणीच उड्या मारत त्याच्या दिशेने गेली. तिला त्यासोबत फोटो काढायचा होता प्रभासने तिला हसून प्रतिसाद दिला. पण ती असं काही करेल याचा अंदाज आजूबाजूच्या कुणालाही आला नाही.

मुंबई विमानतळावर प्रभासच्या चाहत्यांनी त्याला घेरले. चाहत्यांना प्रभाससोबत फोटो काढायचा होता. या चाहत्यांमधून एक तरुणी अतिउत्साहात प्रभास जवळ गेली आणि त्याच्या सोबत फोटो काढला. मात्र नंतर तिला हे स्वप्नवत वाटले असावे त्यामुळे तिने प्रभासच्या गालाला स्पर्श केला. पण तिला आपण चापट मारतोय याचे भान राहीले नाही व तिचा हात जोरात प्रभासच्या गालावर बसला. हे सर्व पाहून विमानतळावरील सर्वजण हसू लागले आणि प्रभासही बावचळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *