Breaking News
Home / बातम्या / साताऱ्यामध्ये मनसे उदयन राजेसोबत, पहा काय म्हणाले उदयनराजे ….

साताऱ्यामध्ये मनसे उदयन राजेसोबत, पहा काय म्हणाले उदयनराजे ….

सध्या निवडणूक जवळ असल्याने प्रचार सुरु आहे. प्रत्येक जण आपला पक्ष श्रेष्ठ असल्याचे दाखून देण्याचे प्रयत्न करत आहे अश्यात शिवरायांचे वंशज म्हणजेच छत्रपती उदयन राजे यांनी देखील आपल्या सोशल मिडीवरील ट्विटर अकाउंटवर एक माहिती शेअर केली आहे. त्या माहितीमध्ये राज ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या सोबत असल्याचं सांगितलं आहे. मनसे पक्ष यावेळी निवडणूक लढवत नसला तरी सरकारला पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी भूमिका राज ठाकरेंनी स्पष्ट केली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या महाआघाडीत मनसे पक्षाला लाल कंदील मिळाला होता. असे असले तरी छत्रपती उदयन राजे यांनी सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते, असे ट्विट करून स्पष्ट केले.

आता साताऱ्यामध्ये कोण निवडून येत हे आपल्याला निवडणुकीनंतर समजेलच मात्र उदयनराजे यांच्या अश्या स्पष्टीकरणामुळे त्यांची ताकत वाढल्याचे दिसून येते. मनसे च्या चाहत्यांसाठी हि एक चांगली गोष्ट देखील आहे मात्र राज ठाकरे लोकसभेची निवडणूक लढवत नसल्याने त्यांमध्ये नाराजी देखील असू शकते. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः पाठीशी असल्याचं स्पष्टीकरण दिल नाही मात्र उदयनराजे यांनी पोष्ट शेअर करून हि माहिती दिली आहे ज्यावेळी मनसेचे पदाधिकारी हजार होते. तुम्ही उदयनराजे यांचे केलेले ट्विट पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *