Breaking News
Home / कलाकार / समोर आला मोदी चित्रपटाचा मेकिंग व्हिडीओ, रोज ६ तासांच्या मेकअपनंतर मोदी बनत होते विवेक ओबेरॉय

समोर आला मोदी चित्रपटाचा मेकिंग व्हिडीओ, रोज ६ तासांच्या मेकअपनंतर मोदी बनत होते विवेक ओबेरॉय

पीएम मोदी च्या जीवनावर आधारित येणार चित्रपट “पीएम नरेंद्र मोदी” मध्ये विवेक ओबेरॉय मोदीजींची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट ५ एप्रिल ला प्रदर्शित होणार आहे मात्र सध्या हा अडचणीत असल्याने प्रदर्शित होण्याची चिन्हे कमी दिसत आहे. अभिनेता विवेक आणि चित्रपट निर्मात्यांनी सांगितले कि, नरेन्द्र मोदी साकारणे खूप चॅलेंजिंग राहिले आहे. चित्रपटाचा मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे त्या व्हिडिओत अभिनेता विवेक ऑबेरॉयला नरेंद्र मोदी दिसावण्याचे प्रयत्न मेकअप मन करत आहेत.चित्रपट निर्माते म्हणाले कि विवेक ला या चित्रपटात मोदींची भूमीक निभावणे खूप कठीण जात होते. त्याहून जास्त अवघड विवेक ला मोदींचा लूक देणे होते. मेकअप आर्टिस्ट्स साठी विवेकला मोदींच रूप देणं देखील खूप मोठं आव्हान होत. विवेक ने देखील व्हिडिओमध्ये सांगितलं कि, मला मोदींचा मेकअप करण्यासाठी ६ तास वेळ लागत होता आणि शूटिंग पाच ते सहा तास चालायचे.

विवेक म्हणाला कि पहिल्यांदा जेव्हा माझा मोदी लूक मेकअप मन ने केला तेव्हा मी मोदी वाटतच नव्हतो. त्यावेळी रात्री मिटिंग घेतली गेली आणि हा चित्रपट बनवायचाच नाही असे ठरले कारण इतके प्रयत्न करून देखील मोदीच रूप समोर येत नव्हतं आणि त्यामुळे फोटोशुटचं काम थांबलं होत. त्यावेळी पॅकअप केलं आणि चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला गेला मात्र त्याच रात्री मेकअप आर्टिस्ट प्रीति ने मेकर्स ला फोन करून सांगितले कि, आम्हाला शेवटची संधी पाहिजे. आम्ही मोदी लुक साठी काम करू शकू. त्यानंतर त्यांना मेकअप ची संधी दिली व सहा तासांच्या मेकअप नंतर मोदीजी च रूप विवेक मध्ये दिसू लागलं व फोटोशूट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *