Breaking News
Home / कला / युट्युब वर लोकप्रिय असलेले इंदुरीकर महाराज आहेत तरी कोण..?? : बघा इथे

युट्युब वर लोकप्रिय असलेले इंदुरीकर महाराज आहेत तरी कोण..?? : बघा इथे

प्रत्येक गावात मंदिर असते आणि तिथे सप्ता बसतो. सर्वच क्षेत्रात बदल होत चालला आहे. सण देखील सध्या पद्धतीने पूर्वी साजरे केले जायचे मात्र आता धूम धडाक्यात साजरे केले जातात. परिस्थितीनुसार सगळीकडे बदल होत असतो तसाच बदल आता धार्मिक क्षेत्रांमध्ये देखील झाला आहे. आता जर का सप्ता असेल, किंवा कीर्तन ठेवायचे असेल तर इंदुरीकर महाराज याना बोलावले जाते. इंदुरीकर महाराज याना खूपच जास्त मागणी आहे मात्र हे इंदुरीकर महाराज आहेत तरी कोण याविषयी थोडक्यात आणि सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.इंदुरीकर महाराज यांचे खरे नाव निवृत्ती महाराज देशमुख आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात असणाऱ्या इंदोरी या गावात राहत असल्याने त्यांची ओळख इंदुरीकर महाराज या नावाने झाली. बी. एस. सी आणि बी. एड शिक्षण घेऊन ते पुढे विनोदी कीर्तनकार बनले. युट्युब, टिक टॉक सारख्या सोशल साईट्सवर त्यांचे कीर्तनाचे व्हिडीओ वायरल होतात जे तुम्ही देखील पहिले असतील. कालानुरूप कीर्तनात बदल आणि विनोदातून समाजप्रबोधन असल्याने ते खूप प्रसिद्ध आहेत असं म्हणण्यात गैर नाही.काही दिवस प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर इंदुरीकर महाराज वयाच्या बावीस तेविसाव्या वर्षी कीर्तन करू लागले. इंदुरीकर यांचं कीर्तन तुम्हाला करायचं असेल किंवा त्यांना बोलवायचं असेल तर तुम्हाला ते दुध दोन वर्ष्यानंतर शक्य होईल कारण त्यांचं बुकिंग झालेलं आहे. इंदुरीकर कमावलेला पैसे आपल्या शिक्षण संस्थेत वापरतात त्यांच्या संस्थेमार्फत त्यांचं सामाजिक काम चालत. इंदुरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख देखील कीर्तनकार आहेत. इंदुरीकरण दोन मुलं आहेत मुलगी ज्ञानेश्वरी व मुलगा कृष्णा ते देखील वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतात. इंदुरीकर महार कीर्तन करण्यासाठी रोज सरासरी ६०० किलोमीटर प्रवास करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *