Breaking News
Home / बातम्या / मॅच संपल्यानंतर विमानतळामधील जमिनीवरच पत्नी साक्षी सोबत झोपला धोनी, चाहते म्हणाले….

मॅच संपल्यानंतर विमानतळामधील जमिनीवरच पत्नी साक्षी सोबत झोपला धोनी, चाहते म्हणाले….

आयपीएल सीजन १२ मध्ये चेन्नई सुपर किंग्स चा कॅप्टन धोनी दार वर्षी प्रमाणे यावर्षी देखील सुंदर प्रदर्शन करत आहे. चेन्नई सुपर किंग्स ने मंगळवारी रात्री कोलकाता नाइट राइडर्स च पराभव करून या सिजनमध्ये आपला आणखीन एक विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर एम. एस. धोनी ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये एयरपोर्ट च्या फरशीवर धोनी आपल्या पत्नी सोबत बॅगेवर डोकं ठेऊन झोपलेला दिसत आहे.तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छिते कि, चेन्नई सुपर किंग्स टीम ला पुढच्या सामन्यासाठी जयपुर ला रवाना व्हायचे होते. जयपुर ला सीएसके राजस्थान रॉयल्स च्या विरोधात आपली पुढची मॅच खेळणार होते. यामुळेच बुधवारी सकाळी एम. एस. धोनी आणि त्याच्या टीम ला चेन्नई मधून जयपुर ला रावण व्हायचं होत. त्यावेळी माही ला इतकी झोप अनावर झाली कि तो एअरपोर्ट वर फ्लाइट ची वाट बघत जमिनीवरच झोपला.

एअरपोर्ट वर जमिनीवर बॅग ठेऊन धोनी आणि त्याची पत्नी बॅगेची उशी करून झोपतानाचा फोटो वायरल होत असून तो स्वतः धोनी ने शेअर केला आहे. फोटो शेअर करत धोनी ने लिहलं आहे कि, “After getting used to IPL timing this is what happens if u have a morning flight” त्याचा मराठीत अर्थ असा होतो कि, “जेव्हा  आयपीएल च्या वेळेची तुम्हाला सवय होते आणि जर सकाळची फ्लाईट असेल तर हे असं होत” त्यावर धोनीच्या चाहत्यांनी कमेंट करून प्रतिसाद दिला आहे. एकाने लिहल ”शांति बनाए रखें, भगवान आराम कर रहे हैं।”दुसर्याने लिहल  – ”सादगी अपने चरम पर.” असे अनेक प्रतिसाद धोनीला मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *