Breaking News
Home / कला / माझ्या नवऱ्याला टार्गेट केलं जातंय: अलंकृता बिचकुले……

माझ्या नवऱ्याला टार्गेट केलं जातंय: अलंकृता बिचकुले……

‘बिग बॉस मराठी’ च घर नेहमीच चर्चेत असत. काही दिवसांपूर्वी शिवानी आणि विना यांनी एकमेकांवर हातापायी केल्याने त्यांची चर्चा होत होती. त्या दोघींच्या काढून देखील टाकणार होते मात्र त्यांना वार्निंग देऊन माफ केले. अश्याच अनेक किस्स्यांमुळे बिग बॉस मराठी चर्चेत असत, हा शो अनेक मंडळी पाहत असते आणि त्याची चर्चा रंगात असते. आता अभिजीत बिचकुले यांच्या बायको च म्हणणं आहे कि “घरातल्या सदस्यांनी गमे प्लॅन करून माझ्या पतीला एकट पडल आहे.” अभिजीत बिचकुले यांच्या पत्नीचं म्हणणं काय आहे पाहूया. ‘टाइम्स ऑफ इंडिया ऑनलाईन’ सोबत बोलतांना अभिजीत बिचकुले यांची पत्नी अलंकृता बिचकुले म्हणाले “माझे पती आणि घरातले बाकीचे सदस्य वेग वेगळ्या गावातून शहरातून आलेले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरातले सदस्य अभिनेते अभिनेत्र्या आहेत आणि माझे पती राजकारणातून गेलेत म्हणून त्यांचे विचार कोणाला समजत नाहीत. मी रोज शो पाहते आणि मला असा वाटत कि बाकीचे सदस्य एकत्र होऊन माझ्या पतीला एकट पडत आहेत व त्यांच्या वर लक्ष साधत आहेत, त्यांना टार्गेट केलं जातंय”. अभिजीत बिचकुले यांच्या बद्दल बोलतानां अलंकृता बिचकुले पुढे म्हणाल्या “माझे पती प्रचंड हुशार आहेत, पण घरातल्या इतर सदस्यांना हे आणखीन समझले नाही. त्यांनी अजून अभिजीत बिचकुलेंना ओळखलंच नाही”. अलंकृता बिचकुले यांनी जे तुम्हाला हे जर तुम्ही बिग बॉस मराठी पाहत असाल तर नक्कीच सांगू शकाल. अनेकांना तीच म्हणणं पटेलही अनेकांना नाही देखील. शो मध्ये अनेक टास्क असल्याने प्रत्येकजण जिंकण्यासाठी प्रयत्न करीत असतो यातूनच भांडण निर्माण होते. अश्यात अलंकृता यांनी काही दिवसांपूर्वी केलेले हे वक्तव्य वायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *