Breaking News
Home / बातम्या / मतदान जवळ आले, या दिवशी नाही मिळणार दारू

मतदान जवळ आले, या दिवशी नाही मिळणार दारू

मित्रानो मतदान जवळ आले कि अनेक पुढारी आपले शक्तिप्रदर्शन करतात असतात. काही दिवसांवर मतदान येऊन पोहचले कि दारू, मटणाच्या पार्ट्या देखील तुम्ही पहिल्या असतील किंवा गेला देखील असाल, मात्र यावर्षी हे खूप कमी प्रमाणात दिसून येईल आणि काही दिवशी तर हे होऊच शकणार नाही कारण तुम्हाला दारू उपलब्ध होणारच नाही. होय निवडणुकीच्या काळात तीन दिवस दारूची दुकाने बंद राहणार आहेत. दुकाने कधी बंद राहणार आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत तसेच एखाद्याने या नियमाचे उल्लंघन केले तर काय होईल ते देखील पाहूया.लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास म्हणजेच दोन दिवस आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मदयविक्री करण्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ (सी) नुसार सक्त मनाई करण्यात आली आहे. या दिवसांना ‘कोरडा दिवस’ म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.वाईन शॉप, सरकारमान्य देशी दारू दुकाने, ताडी केंद्र यांना देखील तसेच मध्य विक्री करणार्यांना देखील हा आदेश लागू केला असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल. तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले आहेत. निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भर वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधित मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. त्यामुळे यावर्षी दारू मिळणार नाही आणि दारूसाठी मतदान करणारी मंडळी यामुळे नाराज होईल मात्र योग्य आणि चांगला उमेदवार निवडून येण्यास यामुळे मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *