Breaking News
Home / कला / बिग बॉस वर लोकप्रिय असलेल्या परागचा हा जागतिक विक्रम तुम्हाला माहिती आहे का?

बिग बॉस वर लोकप्रिय असलेल्या परागचा हा जागतिक विक्रम तुम्हाला माहिती आहे का?

‘बिग बॉस मराठी’ च घर नेहमीच चर्चेत असत. कितीतरी प्रेक्षक मंडळी हा शो मज्जा घेत बघतात. हल्ली बिग बॉस च्या ह्या घरात असलेल्या सदस्यांची, दिवसान दिवस एक नवीन चर्चा बाहेर येते. सध्या बिग बॉस च्या घरात स्ट्रॉंग स्पर्धक असणारे ‘पराग कान्हेरे’ हे नेमके कोण आहेत असा प्रश्न किती तरी लोकांना पडलाय आणि आम्ही याच प्रश्नच उत्तर देणार आहोत सोबतच परागचा जागतिक विक्रम देखील तुम्हाला सांगणार आहोत. चला तर पाहूया बिग बॉस वर लोकप्रिय असलेल्या पराग च्या पार्श्व् भूमीबद्दल.‘बिग बॉस २’ चे स्पर्धक पराग हे एक प्रसिद्ध शेफ आहेत. त्यांचा जन्म पुण्याला १२ एप्रिल १९८५ ला झाला. त्यांचे वडील मोठे बीजनस मन होते. बालपणापासूनच पराग याना स्वयंपाक बनवायची हौस होती म्हणून ते दूरदर्शन वरील ‘कूकिंग शो’ बघून तेच पदार्थ बनवायचा प्रयत्न करायचे. शेफ असलेल्या परागने आपल्या करियरमध्ये ‘शेफ एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ हा किताब मिळवला आहे. त्याने डोळ्यांवर पट्टी लावून पण स्वयंपाक केलाय ते हि ९० मिनिटे. त्याला लहानपणापासून जेवण बनवायची आवड होती.लहान पानापासून जेवण बनवायची आवड असल्याने तो आज प्रोफेशनल कुक बनला. त्यासोबत त्याला अभिनयाची देखील आवड आहे. कुकिंग मध्ये त्यांच्या नावावर ३ जागतिक विक्रम देखील आहेत आणि त्यांचा स्वतःचा युट्युब चॅनल पण आहे. जिथे ते वेग वेगळे पदार्थ बनवायचे व्हिडिओ टाकतात. डोळे बंद करून जेवण बनवले हि देखील एक मोठी कला आहे. हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेला पराग बिग बॉस मराठी २ मध्ये कशाप्रकारे टिकून राहणार आणि कोणती शक्कल लढवणार हे येत्या काही दिवसांमध्ये कळून येईलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *