Breaking News
Home / कला / बिग बॉस मराठी २ मध्ये स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून लोकप्रिय असणारा पराग कान्हेरे आहे तरी कोण? : बघा इथे

बिग बॉस मराठी २ मध्ये स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून लोकप्रिय असणारा पराग कान्हेरे आहे तरी कोण? : बघा इथे

‘बिग बॉस मराठी’ च घर नेहमीच चर्चेत असत. कितीतरी प्रेक्षक मंडळी हा शो मज्जा घेत बघतात. हल्ली बिग बॉस च्या ह्या घरात असलेल्या सदस्यांची, दिवसान दिवस एक नवीन चर्चा बाहेर येते. सध्या बिग बॉस च्या घरात स्ट्रॉंग स्पर्धक असणारे ‘पराग कान्हेरे’ हे नेमके कोण? आहेत असा प्रश्न किती तरी लोकांना पडलाय आणि आम्हाला देखील हाच प्रश्न पडलाय. कुठे त्यांचा जन्म झाला, ते काय काम करतात, त्यांचे वडील कोण आहेत चला मग पाहू काय आहे “पराग कान्हेरे” यांची पार्श्वभूमी?‘बिग बॉस २’ चे स्पर्धक पराग हे एक प्रसिद्ध शेफ आहेत. त्यांचा जन्म पुण्याला १२ एप्रिल १९८५ ला झाला. त्यांचे वडील मोठे बीजनस मन होते. बालपणापासूनच पराग याना स्वयंपाक बनवायची हौस होती म्हणून ते दूरदर्शन वरील ‘कूकिंग शो’ बघून तेच पदार्थ बनवायचा प्रयत्न करायचे. पराग यांनी १०वि नंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला पण अभ्यासात कच्चे असल्या मुळे १२वि मध्ये विज्ञान आणि गणित मधे नापास झाले. त्यांनी परत १२वि ची परीक्षा द्यायचा निर्णय घेतला ज्याची तैय्यारी करतांना त्यांना ‘संडे ब्रेकफास्ट’ ची कल्पना सुचली आणि त्यांनी सोसायटी च्या आठ ते दहा घरातून ब्रेकफास्ट चे ऑर्डर घेणे सुरु केले. त्या नंतर त्यांनी पुण्याच्या काही दुकानां मध्ये रोज ५०० सामोसे आणि २०० बटाटे वडे पोहचवण्याच काम घेतल. १२वि पास केल्या नंतर त्यांनी “फूड क्राफ्ट इन्स्टीट्युड” मध्ये प्रवेश घेतला. कोर्स झाल्यानंतर त्यांनी तब्बल २०० इंटरव्हीयुव देऊन १९९८ मध्ये त्यांची क्रूस मधे कूक म्हणून नोकरी करायची इच्छा पूर्ण झाली. त्या नंतर त्यांनी एका आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी शेफ कढून प्रशिक्षण घेऊन अजून चांगली कूकिंग केली. पराग कान्हेरे हे सर्वात पहिले प्रेक्षकांन समोर इटीव्ही च्या एका ‘मेजवानी रंगद्दार’ नावाच्या शो मधून आले. त्यांनी डोळ्यांवर पट्टी लावून पण स्वयंपाक केलाय ते हि ९० मिनिटे. त्यांच्या नावावर ३ जागतिक विक्रम देखील आहेत आणि त्यांचा स्वतःचा युट्युब चॅनल पण आहे. जिथे ते वेग वेगळे पदार्थ बनवायचे व्हिडिओ टाकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *