Breaking News
Home / कला / बिग बॉस मराठी २ मध्ये सर्वात लोकप्रिय असणारे अभिजित बिचुकले आहेत तरी कोण? बघा इथे…

बिग बॉस मराठी २ मध्ये सर्वात लोकप्रिय असणारे अभिजित बिचुकले आहेत तरी कोण? बघा इथे…

मित्रानो सलमानच्या बिग बॉस या रिऍलिटी शो चे कितीतरी सीजन येऊन गेले. त्यानंतर बिग बॉस मराठी हा कलर्स मराठी वर लागणार शो देखील प्रसिद्ध झाला. अनेक लोक याच्या चर्चा रंगवत असतात. बिग बॉस च्या घरात असलेले स्पर्धक जास्त करून अभिनेते आहेत पण असे काही जन आहेत जे अभिनेते नसून दुसऱ्या पार्श्वभूमीतुन आलेले आहेत. त्यातलेच एक आहेत “अभिजीत बिचुकले” जे कोण आहेत असा प्रश्न कितीतरी लोकांना पडतो. म्हणून आज आम्ही ह्याच प्रश्ना घेऊन उत्तर घेऊन परत आलोय. चला मग पाहू कोण आहेत “अभिजीत बिचुकले”?…. बिग बॉस च्या घरात स्वतःची ओळख बनवण्याची इच्छा घेऊन आलेले “अभिजीत बिचुकले” हे पश्चिम महाराष्ट्र येथील साताऱ्याचे रहिवासी आहेत. अभिजीत स्वतःला कवी मनाचे नेते म्हणतात आणि राजनीतीत येण्यासाठी त्यांनी नगरसेवक ते देशाच्या राष्ट्रपती ची हि निवडणूक लढवली पण त्यांना आता पर्यंत एकाही निवडणुकीत यश आले नाही. अभिजीत यांनी एकदा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना खुलेआम आवाहन दिले होते आणि ते एक बेधडक वक्तव्य करत म्हणले होते कि “२०१९ चा मुख्यामंत्री हि मीच ठरवणार” पण ते असफल झाले. असफल होऊनही अभिजित मागे हटले नाहीत त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. “अभिजीत बिचुकले” यांनी प्रसिद्धी च्या जगात येण्या साठी आज पर्यंत अनेक स्टंट केले आहेत. उदहारण अभिजित यांना लहान पणा पासूनच चिल्लर जमा करायचा छंद होता म्हणून त्यांनी उम्मेदवारी च अपक्ष अर्ज लोकसभा निवडणुकीत दाखल करतांना जी अनामक रकम भरली जाते ती त्यांनी चिल्लर म्हणून १२,५०० रु भरली. अभिजीत नि सांगितले कि निवडणुकीत उभ राहण्याच स्वप्न पूर्ण करतांना त्यांना त्यांच्या लहान पणी च्या साठवलेल्या चिल्लर नीच रक्कम भरायची आहे अशी त्यांची आधी पासून इच्छा होती. म्हणून अभिजीत ने उम्मेदवारी च अर्ज भरायला जातांना चक्क २५,००० ची चिल्लर घेतली होती पण जातीचा दाखला दाखवल्यावर त्यांना फक्त १२,५०० रु भरायला लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *