Breaking News
Home / बातम्या / फेसबुकवर झाले प्रेम, पतीची केली हत्या पहा काय आहे प्रकरण

फेसबुकवर झाले प्रेम, पतीची केली हत्या पहा काय आहे प्रकरण

सोशल साईट्सचा वापर या चार पाच वर्षांपासून खूप जास्त वाढला आहे. यातील फेसबुक या साईटवरून मैत्री, प्रेम आणि खुनाचे प्रकार खूप वाढत आहेत. असाच एक प्रकार नागपूर येथे घडला आहे. नागपूरमधील २५ वर्षीय तरुणीने आपल्या पतीचा खून केला आहे. खून नाही तर आत्महत्या वाटावी म्हणून तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून कट रचला आणि पतीचा खून केला. आरोपी मुलीचे नाव रश्मी शेखर पौनीकर हे आहे.मिळालेल्या माहितीनुसार रश्मी चे वय २५ वर्षे आहे तिला २१ वर्षीय प्रज्वल रणजित भैसारे याच्यासोबत फेसबुकवर मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेम जडले. त्यांच्या प्रेमाच्या मध्ये आरोपी रश्मीच्या पतीचा अडथळा निर्माण होत असल्याने पतीचा खून करायचे ठरवले. रश्मीने आपल्या पतीस मध्यपनाची सवय असल्याने मंगळवारी रात्री रश्मीने शेखरला घरी कामावरून आल्यनंतर रात्री दारू प्यायला दिली आणि रात्री दोन अडीचच्या सुमारास शेखर झोपला असता आपल्या प्रियकराला प्रज्वल रणजित भैसारे ला घरी बोलावले.
प्रज्वल आणि रश्मी यांनी दोघांनी मिळून झोपलेलया शेखरचे हात पाय बांधले आणि त्याच्या तोंडातून आवाज येऊ नये म्हणून चिकटपट्टी तोंडाला लावली. नंतर त्याचा रस्सीने गळा आवळून हत्या केली हे प्रकरण आत्महत्येचे वाटावे यासाठी त्यांनी त्याच्या हाताची नस ब्लेडने कापली. नामदेवनगर बागेजवळ मैदानात त्याला दुचाकीवर बसवून नेऊन टाकले. सुरुवातीला पोलिसांना आत्महत्या असल्यासारखे वाटले पण नंतर रश्मी आणि प्रज्वल ने मिळून त्याची हत्या केल्याचे शोधून काढले. धक्कादायक बातमी समोर आल्याने लक्षात येते कि फेसबुकमुळे असे प्रकार वाढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *