Breaking News
Home / बातम्या / पिवळ्या साडीवाली अधिकारी महिला आहे सलमानची फॅन, पहा काय आहे तिची इच्छा

पिवळ्या साडीवाली अधिकारी महिला आहे सलमानची फॅन, पहा काय आहे तिची इच्छा

यावर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये पिवळ्या साडीवर असणारी महिला अधिकारी खूपच फेमस झाली. ती ज्या मतदान केंद्रावर होती तिथे १०० टक्के मतदान झाले अश्या बातम्या देखील वायरल होत होत्या मात्र त्या ठिकाणी ७० टक्के च्या आसपास मतदान झाले आहे. वायरल जोक्स मध्ये सांगितल जात कि अशी महिला अधिकारी असेल तर १०० टक्के मतदान होईलच. हि महिला “पिवळी साडीवाली” या नावाने फेमस झाली मात्र अजूनही लोक तिला पिवळी साडीवालीनावानेच ओळखतात. त्या महिला अधिकारीच खरं नाव “रीना द्विवेदी” आहे. रीना चे लग्न झालं असून तिला मुल देखील आहे. न्यूज १८ यांच्या न्यूज चॅनेलशी बोलताना रीना म्हणाल्या की, मी सलमान खानची फार मोठी चाहती आहे. तसेच लोक माझ्या जवळ येऊन तू बिग बॉसची पुढील स्पर्धक होशील म्हणतात. याबद्दल सविस्तर बोलताना रीना म्हणाल्या की, ‘सध्या तरी माझ्याकडे अशी कोणतीही ऑफर आली नसून, अशी एखादी ऑफर आली तर त्याचा नक्कीच स्वीकार करेन.’ रिना यांना चित्रपटानंच्याही ऑफर मिळाल्या होत्या. पण मुलासाठी त्यांनी सर्व चित्रपटांना नकार दिला.पीडब्ल्यूडी विभागात काम करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक संजय द्विवेदी यांच्याशी २००४ मध्ये रिनाचे लग्न झाले होते. परंतु २०१३ मध्ये प्रदीर्घ आजाराने संजय यांचं निधन झालं. रिनाचा १३ वर्ष्याच्या मुलगा लखनऊ मधील एलपीएसमध्ये शिक्षण घेत आहे. रीना इतकी फेमस झाली कि लोक तिच्याकडे येऊन सेल्फी काढत आहे आणि रिनाच्या घरच्यांना देखील तिच्या प्रसिद्धीचा फायदा झाला आहे. रिनाच्या मुलगा आदित्य द्विवेदी हा इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे. आदित्यला त्याची आई सेलिब्रिटी झाली असं येऊन सांगत असतात त्यामुळे त्यालाही खूप चांगलं वाटत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *