Breaking News
Home / कलाकार / पहा हनी सिंगच्या बायकोचा पहिला फोटो, इतकी सुंदर आहे कि पाहतच राहाल

पहा हनी सिंगच्या बायकोचा पहिला फोटो, इतकी सुंदर आहे कि पाहतच राहाल

हनी सिंगचे नाव कोणाला माहित नसेल हे शक्य नाही, त्याची गाणी सगळीकडे प्रसिद्ध आहेत. भारतातच नव्हे तर परदेशामध्येही ह्या गाण्यांना लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. पार्टी असेल तर हानी सिंगची गाणी वाजलीच म्हणून समजा तसेच गाडीमध्ये देखील त्याची गाणी नेहमी वाजतात. हानी सिंगचे ट्विटरवर ४ मिलिअन्स फॉलोवर्स आहेत आणि फेसबुकवर ३० मिलिअन्स फॉलोवर्स आहेत. हा रॅप चा बादशाह आहे ज्याने भारतात पहिल्यांदाच रॅपला एवढे प्रसिद्धीस आणले आणि ऐकणाऱ्यांना ते चांगलेहि वाटते. आज आपण इथे याच हनी सिंगच्या बायकोचे फोटो बघणार आहोत, तिला तुम्ही अजूनही पहिले नसेन. हनी सिंगचा जन्म १५ मार्च १९८३ ला पंजाबमधील होशियारपूर मध्ये झाला आणि तो एक शीख कुटुंबातील आहेत. हनी सिंगचे त्याच्या बालपणाच्या मैत्रिणीबरोबर लव्ह मॅरेज झाले आहे. तिचे नाव शालिनी तलवार सिंग आहे. हनी सिंगने सांगितले कि, ते दोघे एकाच शाळेमध्ये शिक्षण घेत होते. हनी सिंगने त्याच्या या सुंदर पत्नीसोबत एका टीव्ही शोमध्येही भेट दिली होती. त्यावेळी ते दोघेही सुंदर दिसत होते.शालिनी दिसण्यामध्ये बॉलीवुड अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. तुम्ही आज शालिनीचे हे फोटो पाहून तिला बघतच राहाल. हनी सिंगचे ब्लू आईज हे गाण खूप प्रसिद्ध आहे. याबरोबरच त्याच्या चार बोतल वोडका, पार्टी ऑल नाईट या गाण्यांनीही सगळ्यांचे मन जिंकले आहे. एक काळ असा होता कि हनी सिंग गायब झालेला, असं म्हणलं जात कि त्यांना नशेची सवय लागल्याने त्याच्या उपचारासाठी ते विदेशात गेले होते. आता तो एकदम ठीक आहेत. मात्र आता हानी सिंगचे गाणे पूर्वीसारखे हिट होत नाही आणि नवीन गाणी ऐकायला हि मिळत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *