Breaking News
Home / सामान्य ज्ञान / निवडणुकी अर्जासाठी १२५०० रुपये चिल्लर भरण्यामागे अभिजित बिचूकलेंनी काय कारण सांगितले

निवडणुकी अर्जासाठी १२५०० रुपये चिल्लर भरण्यामागे अभिजित बिचूकलेंनी काय कारण सांगितले

बिग बॉस मराठी मध्ये अभिजित बिचूकले तुमचे मनोरंजना करीत असतील तसेच बाहेर देखील त्यांच्या वागण्यामुळे हसू येते. २०१९ च्या निवडणुकीत देखील असाच काही प्रकार अभिजित बिचूकले यांनी केला होता. चित्रपटामध्ये ज्याप्रकारे मकरंद अनासपुरे चिल्लर घेऊन अर्ज भरण्यास जातात तसच अभिजित बिचूकले यांनी २०१९ च्या निवडणुकीत अर्ज भरायला जाताना केले. अभिजित बिचूकले दोन पिशव्यांमध्ये २५००० रुपयांची चिल्लर घेऊन अर्ज भरण्यास गेले होते. पिशव्यांमध्ये १० रुपये ५ रुपये १ रुपया अशी नाणी होती. स्वतःचा छंद म्हणून साठवलेली चिल्लर अभिजित बिचूकले यांनी निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी नेली. जातीचा दाखल देखील अभिजित बिचूकले घेऊन गेले होते त्यामुळे त्यांना सूट मिळाली व त्यांनी १२,५०० रुपये इतकी रक्कम निवडणूक विभागात भरली. दोन पिशव्या चिल्लर आणल्यानंतर त्यांनी जिल्हाअधीकारी कार्यालयात त्यांनी पैसे मोजले. त्यांनी आणलेली चिल्लर पाहून कार्यालयातील लोक देखील अवाक झाले. अभिजित बिचूकले म्हणाले कि मी सांगलीचा जावई आहे आणि पाहून देखील आहे. मला सांगली चांगली करायची आहे.सांगलीचा विकास करण्यासाठी अभिजित बिचूकले उभे आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी मीडियाशी बोलताना दिली. अपक्ष म्हणून उभे राहिलेले अभिजित बिचूकले निवडून आले नाहीत मात्र त्यांनी अर्जासाठी आणलेली रक्कम चर्चेचा विषय ठरला होता. स्वतःचा छंद म्हणून साठवलेली चिल्लर रक्कम त्यांनी आणली होती. यामुळे लोकांचे मनोरंजन देखील झाले. बिग बॉस मराठी मध्ये देखील त्यांचे मनोरंजन तुम्ही कलर्स मराठीवर पाहू शकता. २५००० रुपयांची चिल्लर त्यांनी आणली होती मात्र जातीचा दाखल असल्याने त्यांना सूट मिळाली व अभिजित बिचूकले याना १२५०० रुपयेच भरावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *