Breaking News
Home / बातम्या / दोन मुलींसोबत एकाच मांडवात लग्न, पहा कोठे घडणार आहे हि घटना

दोन मुलींसोबत एकाच मांडवात लग्न, पहा कोठे घडणार आहे हि घटना

मित्रानो अनेकांचे प्रेम प्रकरण लग्नापूर्वी असते आणि लग्नानंतरही असते. लग्नानंतरही अनेकजण जुने किंवा नवीन प्रेमप्रकरण असल्याने नाईलाजाने लग्न करावे लागते. अनेकजण दोन लग्न करतात अश्या अनेक केसेस तुम्ही पहिल्या असतील मग त्याला विविध करणे असू शकतात. एका बहिणीने तर आपली बहीण मतिमंद असल्याने दोघींशी लग्न करण्याची अट नवऱ्यापुढे ठेवली होती मात्र आता एकाच मांडवात दोन वेवेगळ्या कुटुंबातील मुलीशी लग्न करण्याची बातमी समोर येत आहे. त्यांच्या लग्नाची हि निराळी लग्नपत्रिका वायरल होत आहे.वायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेत स्पष्ट दिसत आहे कि एक मुलगा दोन वेगवेगळ्या कुटुंबाबतील मुलीशी लग्न करणार आहे त्यामागचे नेमके कारण काय आहे आपण पाहूया. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वसा(सुतारपाडा) मध्ये राहणार संजय धाडगा हा युवक रिक्षा चालवतो. आई वडिल नसून त्याने हिम्मत न हारता काम केले. संजयला दहा वर्षांपूर्वी बेबी नावाच्या मुलीवर प्रेम झाले आणि नंतर दोघांचं प्रकरण जुळलं.अनेक आदिवासी लोक पैसे नसल्याने लग्न न करता मुलीसोबत राहतात आणि आपला संसार करतात असच संजय सोबत घडलं संजय बेबी सोबत राहत असताना दोन वर्ष्यानंतर त्याला रीना नावाच्या मुलीशी प्रेम झाले. बेबी आणि रिनासोबत संजय एकत्र राहून संसार करतो. असे असले तरी दोघी बायकांना एकमेकींशी काहीच तक्रार नाही. लग्नापूर्वीच बेबीला एक मुलगा व मुलगी आहे आणि रिनाला एक मुलगी आहे. आता त्यांची परिस्थिती चांगली झाल्यामुळे एकाच मांडवात ते लग्न करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *