Breaking News
Home / कलाकार / ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम सखी गोखलेचे ह्या अभिनेत्यासोबत झाले लग्न. बघा कोण आहे तो अभिनेता

‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम सखी गोखलेचे ह्या अभिनेत्यासोबत झाले लग्न. बघा कोण आहे तो अभिनेता

मित्रानो २०१८ मध्ये अनेक दिग्गज कलाकारांचे लग्न झाले. २०१९ मध्ये देखील राज ठाकरे यांच्या मुलाचे लग्न पार पडले अश्यातच एक चांगली बातमी ऐकायला मिळत आहे. होय सगुणाबागेत हा देखणा लग्नसोहळा पार पडला आहे ज्यामध्ये एक नवीन जोडपं लग्नबंधनात अडकलं आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सखी गोखले ने गुरुवारी लग्न केले आहे. जवळचे मित्र आणि नातेवाईक अशा मोजक्याच जवळपास ८० लोकांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न पार पडलं.अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी यांनी गुरुवार दिनांक ११ एप्रिल २०१९ या दिवशी लग्न केले. मुंबईजवळच्या ‘सगुणाबाग’मध्ये सखी आणि सुव्रत यांचा लग्नसोहळा पार पडला. आता लवकरच मुंबईत दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन होणार आहे. या लग्नाची माहिती स्वतः सखीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिली.सखी गोखलें आणि सुव्रतच्या लग्नात उपस्थित असणाऱ्या त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी देखील या नवीन जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. अभिनेत्री शुभांगी गोखले आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची मुलगी सखी गोखले आहे. “दिल दोस्ती दुनियादारी” ही सखी गोखले ची पहिली मालिका असली तरी सखीने अगोदर ‘रंगरेझ’ या हिंदी सीरियलमध्ये छोटीशी भूमिका केली होती. तसेच तिने अनेक जाहिराती देखील केल्या आहेत. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत सखी आणि सुव्रतची जोडी लोकांना फार आवडली नंतर त्यांनी ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात व ‘दिल दोस्ती दोबारा’ या मालिकेतही एकत्र काम केले. सुव्रतने शिकारी, पार्टी, डोक्याला शॉट अश्या सिनेमातही काम केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *