Breaking News
Home / कला / दिगंबर नाईकनं घरात शोधला फिटनेस ट्रेनर : बघा कोण आहे

दिगंबर नाईकनं घरात शोधला फिटनेस ट्रेनर : बघा कोण आहे

मित्रानो सलमानच्या बिग बॉस या रिऍलिटी शो चे कितीतरी सीजन येऊन गेले. त्यानंतर बिग बॉस मराठी हा कलर्स मराठी वर लागणार शो देखील प्रसिद्ध झाला. अनेक लोक याच्या चर्चा रंगवत असतात. हल्ली बिग बॉस च्या ह्या घरात असलेल्या सदस्यांची, दिवसान दिवस एक नवीन चर्चा बाहेर येते. ‘बिग बॉस मराठीच्या’ घराजवळ बागेच्या परिसरात घरातील सदस्यांसाठी खास जिम उभारण्यात आली आहे. या व्यायामशाळेत जवळजवळ सगळेच स्पर्धक व्यायाम करतात. व्यायाम करताना ते एकमेकांशी व्यायामाबद्दल चर्चा करीत असतात.कोणीही व्यक्ती जिम मध्ये गेल्यावर साहजिकच चर्चा व्यायामाबद्दल होणार आणि ते एकमेकांना व्यायामाचे सॅले देणार असेच बिग बॉस च्या व्यायामशाळेत देखील घडले. घरातील सदस्य देखील एकमेकांना टिप्स देताना दिसतात यावरूनच दिगंबर नाईक याने घरात स्वत:साठी फिटनेस ट्रेनर शोधला आहे असं चित्र दिसत आहे. दिगंबर सध्या माधव देवचकेकडून फिटनेस टिप्स घेताना दिसत आहेत. वूट ऍप वर ‘अनसीन अनदेखा’ च्‍या एका व्हिडिओ मध्ये माधव दिगंबरला फिटनेसबाबत, पोट कमी करण्याबाबत सांगताना दिसतो.जिम करताना दिगंबर याना त्यांचे पोट वाढल्याने ते चिंतीत दिसतात व यासाठी ते जास्त व्यायाम करतात. माधव त्यांना सांगतो, पोटातील गॅस कमी करण्याची गरज आहे. गॅस कमी झाल्यास पोट आत जाईल. यासोबतच माधव दिगंबर याना तुम्ही प्लँक करा असा सल्लाही तो देतो. माधव दिगम्बर याना माझ्या सल्ल्याचा फायदा होईल असे सांगतो त्यानंतर दिगंबर आपल्या वाढलेल्या वजनाबद्दल सांगतो कि, “माझा पर्सनल ट्रेनर आहे. त्याने दिलेलया डाएट ला फॉलो करून मी १७-१८ किलो वजन कमी केलं आहे. बिग बॉसच्या घरात येण्याआधी मी १४ किलो वजन केलंय. मला जवळवळ ४ महिने लागले. पण हळूहळू मी ते कमी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *