Breaking News
Home / बातम्या / दहावीत शिकत असणाऱ्या मुलीने केली आत्महत्या, पहा कोठे घडली घटना

दहावीत शिकत असणाऱ्या मुलीने केली आत्महत्या, पहा कोठे घडली घटना

मित्रानो आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे मग ते शिक्षण असो, नोकरी असो किंवा कोणतेही क्षेत्र असो स्पर्धा असतेच. यामुळे टेन्शन घेऊन आत्महत्या घडण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळेतील मुलं कमी मार्क्स पडले किंवा नापास झाले यामुळे घरच्यांच्या भीतीने आत्महत्या करत असतात याच्या अनेक केसेस आपण अगोदर पहिल्या असतील. मोबाईलमधील गेम्स मुले देखील अनेकांनी आत्महत्या केली आहे त्यामुळे पुढे कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आज अशीच एक धक्कादायक बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.बीड मधील आष्टी तालुक्यातील खिळद या गावात राहणाऱ्या आरती आजिनाथ गर्जे या अवघ्या सोळा वर्ष्याच्या मुलीने आत्महत्या केली आहे. आरती हि इयत्ता दहावी मध्ये शिकत होती. आरतीचे वडील आजिनाथ गर्जे हे पनवेलमध्ये चालकाचे काम करतात. त्याच्या खिळद या गावी त्यांची पत्नी आणि तीन मुली राहतात त्यापैकी आरती हि सर्वात मोठी मुलगी होती. आरतीने दहावीची परीक्षा दिलेली होती मात्र तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. दुपारच्या वेळी आरतीची आई दवाखान्यात गेलेली असताना हि घटना घडली. दिनांक १७ में २०१९ रोजी दुपारच्या वेळी आरतीची आई दवाखान्यात गेलेली होती. आरतीच्या दोन्ही लहान बहिणी घराबाहेर खेळात होत्या त्यावेळी आरतीने घरात गळफास लावून आत्महत्या केली आणि आपले जीवन संपवले. अवघ्या सोळा वर्ष्याच्या वयात तिने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजले नाही मात्र पालकांनी मुलांवर लक्ष ठेऊन त्यांचे प्रश सोडवणे गरजेचे आहे इतकेच याहून लक्ष्यात येते. अंभोरा पोलिसांनी हि घटना घडताच तेथे धाव घेतली व घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *