Breaking News
Home / सामान्य ज्ञान / तांब्याच्या पात्रातील पाणी पिल्याने पोट राहत एकदम चांगलं, पहा आणखीन फायदे

तांब्याच्या पात्रातील पाणी पिल्याने पोट राहत एकदम चांगलं, पहा आणखीन फायदे

मित्रानो भारतातात पूर्वी लोक तांब्याच्या भांड्यात पाणी पित होते त्यामुळे तेव्हा जास्त आजार होत नव्हतेच. सर्वाना इतकं माहित आहे कि आपल्याला कोणताही आजार होतो तर तो पोटाच्या बिघाडामुळे होतो. आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर देखील डॉक्टर बहुतेकदा प्रश्न करतात कि तुम्ही काय खाल्ले होते. यावरूनच लक्ष्यात येते कि पचन शक्ती चांगली असेल तर आजार होणार नाहीत. पचनशक्ती चांगली असल्यास पोटाचे आजार होणार नाहीत त्यासाठी काय काय करावे ते आपण आज पाहणार आहोत. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिल्याने पोट नेहमी चांगलं राहत, स्मरण शक्ती चांगली राहते त्यामुळे तांब्याच्या पात्रातील पाणी पिणे नेहमी चांगलेच आहे. तुम्ही आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या वेळेची भांडी पहिली तर तांब्याची काहीशी भांडी तुम्हाला दिसतीलच. पूर्वी तांब्याच्या भांड्याने पाणी पिल्यानेच लोक आजारी पडत नव्हते व दीर्घकाळ जगायचे. पण फक्त हे एकच कारण नाही कि पूर्वीचे लोक आजारी नव्हते पडत पण तांब्याच्या भांड्याचा वापर देखील गरजेचा आहे. तांब्याच्या पात्रात ठेवलेल्या पाण्यात घातक बॅक्टेरिया असेल तर तो मारून जातो यामुळे डायरिया आणि कावीळ सारखे आजार होत नाहीत.शरीरात जर कॉपर ची कमतरता असेल तर ती कमतरता तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने कमी होते. पोटाचे आजार पासून मुक्ती मिळते, जर गॅस, ऍसिडिटी, पोट दुखी, कब्ज असेल तर हे आजार असतील तर ते दूर होतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराची आंतरिक स्वछता होते ज्यामुळे लिव्हर आणि किडनी चांगली राहून आपलं काम योग्यपणे पार पाडते. अनेक प्रकारचे होणारे इन्फेक्शन तुम्हाला होणार नाहीत. थायरॉड सारखा आजार देखील यामुळे नियंत्रित राहतो. तांब्याच्या पात्रातील पाणी कसे प्यावे तर, रात्रीच्या वेळी तांब्याच्या भांड्यात पाणी भरावे व सकाळी रिकाम्यापोटी ते पाणी प्यावे दिवसभर देखील तुम्ही पिऊ शकता मात्र सकाळी रिकाम्यापोटी पिल्याने जास्त लाभ मिळतो. भारतातील साधू अजूनही तांब्याच्या कमंडलूतील पाणी पितात व विहरीचे पाणी पितात त्यामुळे ते आजारी पडत नसावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *