Breaking News
Home / बातम्या / तनुश्री आणि नाना च्या मुद्याला नवीन वळण, तनुश्री आता म्हणाली ….

तनुश्री आणि नाना च्या मुद्याला नवीन वळण, तनुश्री आता म्हणाली ….

बॉलिवूड इंडस्ट्री हि खूप मोठी आहे. त्यामध्ये अनेक छोटे मोठे कलाकार आहेत प्रत्येक जण प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ऍक्टिंग तर महत्वाची आहे त्या बरोबर राहणीमान, वेशभूषा, स्वभाव सर्वच गरजेचं आहे. नाना पाटेकरांनी इतके वर्ष उत्तम भूमिका बजावून नाव कमावले आणि पुढे गेले. असेच अनेक कलाकार आहे ज्यांनी नाव कमावले आहेत परंतु हे नाव बदनाम व्हायला वेळ नाही लागत परंतु ते कमवायला आयुष्य निघून जात. नानांनी हॉर्न प्लिज या चित्रपटात काम केले होते.१० वर्ष्यापूर्वी तनुश्री दत्त ने नाना वर अश्लील आरोप लावले होते. याची तक्रार तिने डॉयरेक्ट ला केली होती पण डॉयरेक्ट ने तनुश्रीलाच बाहेरचा रास्ता दाखवला. तनुश्री १० वर्षानंतर पुन्हा भारतात आली आणि त्या गोष्टीला मीडिया समोर, लोकांसमोर आणले. नाना चे नाव बदनाम होऊ लागले हे प्रकरण जास्त वाढल्याने मीडिया नाना कडे गेली तेव्हा नाना म्हणाले “माझ्या वकिलांनी सांगितले आहे कोणाशी काही बोलू नका जे खर आहे ते खर आहे त्याला कोणी बदलू नाही शकत.” आता हे प्रकरण शांत झालं होत मात्र पुन्हा याला नवीन वळण लागलं आहे. मिड डे मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार ओशिवरा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या जबाबांपैकी कोणताच जबाबात आणि तनुश्रीने नानांवर केलेल्या आरोपांमध्ये साधर्म्य आढळलेलं नाही. एकही साक्षीदाराला तनुश्रीने सांगितलेल्या घटनाक्रमापैकी काहीच आठवत नसल्याची बाब समोर येत आहे. इतकच नाही, तर अभिनेत्री डेझी शाह जी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या वेळी सहायक नृत्यदिग्दर्शिकेचं काम पाहात होती, तिनेही आपल्याला दहा वर्षांपूर्वी घडलेल्या कोणत्याच घटना लक्षात नसल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत १२ ते १५ जबाब नोंदवले आहेत. पण, त्यापैकी कोणीच तो घटनाक्रम मात्र सांगितलेला नाही. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं हा प्रश्न मात्र कायम राहत आहे. या सर्व प्रकरणावर खुदद् तनुश्रीनेही प्रतिक्रिया दिली आहे. ते साक्षीदार होते तरी कोण?, असा प्रश्न तिने उपस्थित केला. ते माझ्या बाजूने होते की नानांच्या? ते नानांचे मित्र असतील तर ते माझ्या आणि त्यांच्या साक्षीत फरक हा आढळणारच. माझं शोषण झालं होतं, हे सिद्ध करण्यासाठी मला कोणा साक्षीदाराची गरज नाही’, असं ती म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *