Breaking News
Home / कला / टाटा मोटर्स मध्ये काम करणारा जेव्हा IPS बनून २५ वर्षानंतर रतन टाटा ह्यांना भेटतो

टाटा मोटर्स मध्ये काम करणारा जेव्हा IPS बनून २५ वर्षानंतर रतन टाटा ह्यांना भेटतो

मित्रानो अनेक लोक असे आहेत जे गरिबीतून वर आले आहेत म्हणजेच परिस्थितीवर मत करून श्रीमंत झाले आहेत. अनेक जणांना कोणीतरी मदत केली आणि त्यांच्या मदतीमुळे ते मोठे झाले तर काही आपल्या हिमतीवर मोठे झाले आहेत. जे लॉग गरिबीतून वर येतात त्यांना कष्टाची, उपकारांची जाणीव असते. असाच एक किस्सा आज आपण पाहणार आहोत. महेश भागवत हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील मूळचे रहिवासी आहेत. महेश भागवत या व्यक्तीने जवळपास २६ वर्षयांपूर्वी रतन टाटा यांच्या टाटा मोटर्समध्ये काम केले होते.महेश यांचे वडील पेशाने शिक्षक होते मात्र मुलाने सिव्हिल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतले आणि त्यानंतर १९९३ मध्ये टाटा मोटर्समध्ये कमला लागले. काहीदिवसांनी महेश यांनी आयपीएस ची परीक्षा पास झाले. अनेकांना आपली स्वप्न पूर्ण होतील असे वाटत नसते तसेच महेश याना देखील वाटत होते. मागच्या खूप वर्ष्यांपासून आंधरप्रदेश येथे आयपीएस म्हणून काम करतात. तेलंगणा हे राज्य झाल्यानंतर तो प्रदेश महेश यांच्याकडे देण्यात आला होता. बालतस्करी आणि स्त्रियांसाठी महेश यांनी मोठी कामगिरी केली आहे. तसेच तेलंगणा मधील शरीरविक्री देखील बंद महेश यांनीच केली.महेश यांनी तेथील स्थानिक भाषा शिकून आपले कार्य केले आणि अजूनही करत आहेत. अदिबाटला मधील टाटा एअरोस्पेस बोईंग प्लान्टच्या उद्घाटनावेळी महेश भागवत हे आपली कर्तव्य निभावत होते. याच दरम्यान माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री केटीआर यांनी महेश भागवत यांचा रतन टाटा सोबत परिचय करुन दिला. असा मोठा क्षण महेश याना खूप मोलाचा वाटला त्यामुळे त्यांनी हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर तेव्हाच फोटो शेअर करत महेश म्हणाले कि, “मैने टाटा का नमक खाया है.” यावरूनच लक्षात येते कि माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे सुरुवातीचे क्षण आणि परिश्रम याचे मोल त्याच्या आठवणींमध्ये राहतातच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *