Breaking News
Home / कलाकार / टाईमपास २ मधल्या दगडूची खरी पत्नी पहा कशी दिसते आणि त्याचा जीवनप्रवास

टाईमपास २ मधल्या दगडूची खरी पत्नी पहा कशी दिसते आणि त्याचा जीवनप्रवास

“टाईमपास” चित्रपट हा खूप हिट झाला हाऊसफुल असणाऱ्या टाईमपास ने चांगला गल्ला देखील जमवला त्यावेळी सोशल साईट्सवर दगडू आणि प्राजु म्हणजेच केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांचे खूप फोटो वायरल होत होते आणि डायलॉग देखील वायरल झाले होते. अनेकांनी टाईमपास २ चित्रपट येत असल्याच्या खोट्या बातम्या देखील वायरल केल्या होता. यामुळेच टाईमपास २ चित्रपट निर्मित केला गेला असावा. टाईमपास २ मध्ये दगडू मोठा झालेले दाखवले आहे आणि या दगडूची भूमिका साकारणारा अभिनेता ‘प्रियदर्शन जाधव’ याच्या पत्नीविषयी आणि कुटुंबाविषयी आज आपण पाहूया.प्रियदर्शन जाधव याचा जन्म २९ एप्रिल १९८० ला कोल्हापूर मध्ये झाला. प्रियदर्शन हा मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक आहे. टाईमपास २ चित्रपटामध्ये त्यानेच डायलॉग लिहले आहेत आणि तोच मुख्य भूमिकेत आहे. प्रियदर्शन १९९७ ला मुंबईत आल्यानंतर त्याने ऍक्टिंग सुरु केली आणि तो अभिनेता बनला त्याने टाईमपास १ आणि टाईमपास २ हे दोन्ही चित्रपट लिहले आणि ते गाजले देखील. त्याने फु बाई फु, दिल दोस्ती दुनियादारी, चूक भूल द्यावी घ्यावी अश्या मालिकांमध्ये काम केले आहे तसेच चिंटू २, हापूस अश्या चित्रपटात देखील काम केले आहे. २० डिसेंबर ला प्रियदर्शन चे वैभवी गुप्ते सोबत लग्न झाले आणि या दोघांना एक मुलगी देखील आहे.मुंबईजवळील ठाणे येथे प्रियदर्शन राहत असून त्याचे मूळ गाव कोल्हापूर हे आहे. २०१८ मध्ये आलेल्या मास्क चित्रपटात देखील त्याने काम केले आहे आणि आता येणाऱ्या “मी पण सचिन” या चित्रपटात स्वप्नील जोशी सोबत देखील तो झळकणार आहे. अभिनयाची आवड नसून अभिनेता बनलेल्या आणि टाईमपास सारखे मोठे सिनेमे लिहणाऱ्या प्रियदर्शन जाधव ला भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *