Breaking News
Home / कलाकार / खूपच साधी होती अमिताभ बच्चन ची लग्नपत्रिका, वरातीत फक्त ५ जन होते……

खूपच साधी होती अमिताभ बच्चन ची लग्नपत्रिका, वरातीत फक्त ५ जन होते……

अमिताभ आणि जया बच्चन च्या लग्नाला आज ४६ वर्ष झाले तरी त्यांच्यात एकमेकांसाठी प्रेम आणि आदर दिवसान दिवस वाढत चाल्लय. लग्नाच्या इतक्या वर्ष्यानंनतर जिथे जोडपे एकमेकांसोबत राहायला कंटाळून जातात तिकडेच दुसऱ्या बाजूला ह्यांच प्रेम दिवसान दिवस तरुण होत चाललंय. अमिताभ आणि जया बच्चन प्रत्येक पार्टी आणि फंक्शन मधे पण एकत्रच दिसतात. लग्नाळू जोडप्यात अमिताभ आणि जया बच्चन चा प्राधान्य दिल जात. बॉलीवूड मधल्या किती ही जोड्यांना अमिताभ आणि जया बच्चन सारख बनायच आहे. तर मग चला पाहू आपल्या आज च्या आपल्या लेखात काय विशेष आहे.अमिताभ आणि जया बच्चन च्या लग्नाला आज म्हणजे ३ जून २०१९ ला ४६ वर्ष पूर्ण झाले, तरी आज ही त्यांच्या मधल प्रेम नवीन लग्नाळू जोडप्यान सारख बघायला मिळेल. अमिताभ आणि जया बच्चन च्या लग्ना चा प्रवास सोप्पा न्हवता, पण त्या वेळेला ही गोष्टी प्रसिद्ध होती. मानल जात की जया च्या मनात त्यांच्या साठी प्रेम फक्त सहानभूती होती. “गुड्डू” चित्रपटातुन अमिताभ बच्चन ला काढल त्या नंतर त्यांच्या मधे मैत्री झाली. अमिताभ आणि जया बच्चन च लग्न साध्या पद्धतीने झाले होते. चित्रपट “अभिमान” यात अमिताभ बच्चन आणि जया ने एकत्र काम केले होते. ज्या नंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय केला. लग्न आधीच त्यांनी विदेश फिरायला जायच ठरवल पण हरीवंशराय बच्चन यांनी याची परवानगी न देता म्हणाले जर एकत्र फिरायच आहे तर पहिले लग्न करा. म्हणून ह्या गडबडीत अमिताभ आणि जया बच्चन यांनी ३ जून ला साध्या पद्धतीत लग्न केले. अमिताभ बच्चन च लग्न अस होईल ह्याचा विचार कोणीच केला न्हवता, पण त्यांचे वडील हरीवंशराय बच्चन हे खूप साध्या विचारांचे होते म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाच लग्न सुद्धा साधच केल. लग्नाच्या पत्रिकेत फक्त एवढच लिहिल होत की “आमचा सुपुत्र अमिताभ आणि श्रीमती आणि श्री तरुण कुमार भादुडी यांची सुपुत्री जया यांचा विवाह रविवार ३ जून ला संपन्न होत आहे, आपल्या आशिर्वादा ची आवश्यकता आहे”. लग्नात अमिताभ बच्चन यांच्या कढून वरातीत फक्त ५ जन गेले होते, पण जया बच्चन च्या परिवारा सोबत असलानी आणि फरीदा जलाल ह्यांनी वराती च स्वागत केलं. तेवढच न्हवे तर जया बच्चन च्या परिवारा ने लग्नानंतर भोपाळ येथे रिसेप्शन पार्टी पण दिली, ज्यात चित्रपट जगातले किती तरी अभिनेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *