Breaking News
Home / सामान्य ज्ञान / खलीने केले गुपित उघड, या कारणामुळे WWE मध्ये जात नाही

खलीने केले गुपित उघड, या कारणामुळे WWE मध्ये जात नाही

‘द ग्रेट खली’ने आता भविष्यात WWE मध्ये भाग न घेण्याचा निर्णय केला आहे. एवढाच नव्हे तर द ग्रेट खलीला हॉलिवूड मधून खूप साऱ्या चित्रपटांच्या देखील ऑफर आल्या होत्या, पण त्यांनी काम करण्यास नकार दिला. खली ने ह्या सर्व गोष्टींचा खुलासा गुरुवारी एका जिमच्या उदघाट्न कार्यक्रमाच्या वेळेस केला. ह्या विषयी सांगताना खली म्हणाला कि, WWE कोणीही ट्रेनिंग देत नाहीत व ह्यामुळे जर तो WWE मध्ये परत गेला तर त्याच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये जे २५० कुस्तीपटू आहेत त्यांचे भविष्य वाया जाईल आणि असे करणे खलीला जमणार नाही. खलीने सांगितले कि भारतामध्ये एवढे पैशेवाले ट्रेनर्स नाहीयेत कि ते भारताबाहेर जाऊन ह्या सर्वांना ट्रेनिंग करू शकतील आणि ह्याच सर्व कुस्तीपटूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी द ग्रेट खलीने जालंधर मध्ये स्वतःची अकॅडमी उघडली आहे.खलीच्या ह्या अकॅडमी मध्ये हरियाणा व पंजाब मधील शेकडो युवा ट्रेनिंग घेत आहेत. त्याच्या अकॅडमी मधील कुस्तीपटू कविता (हार्ड केडी) हि WWE मध्ये गेली आहे. हार्ड केडी चे तिकडे सिलेक्शन झाल्यावर ग्रेट खलीने त्याच्या शिष्याविषयी आनंद व्यक्त केला.खली म्हणाला कि जर सरकार मदत करत नसेल तर आपल्या स्वतःला मेहनत करावी लागेल आणि खलीने देखील स्वतः मेहनत करून भारतातील कुस्तीपटूंसाठी अकेडमी उघडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *