Breaking News
Home / कलाकार / आता आता : “उरी : द सर्जिकल स्ट्राईक” मधील या अभिनेत्याचे झाले निधन

आता आता : “उरी : द सर्जिकल स्ट्राईक” मधील या अभिनेत्याचे झाले निधन

मित्रानो “उरी : द सर्जिकल स्ट्राईक” चित्रपट तुम्ही सर्वानी पहिलाच असेल काहींनी या चित्रपटाची स्टोरी ऐकली असेल कि हा भारतीय सैनिकांवर आधारित चित्रपट आहे आणि चांगला चित्रपट आहे. या चित्रपटा मधील अभिनेत्याचे निधन झाले आहे त्यामुळे हि एक वाईट बातमी असून बॉलिवूड मध्ये शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील बॉलिवूड अभिनेता नवतेज हुंडाल यांचं निधन झालं आहे. चित्रपटात गृहमंत्र्यांची भूमिका हुंडाल यांनी साकारली होती.

अनेक दिग्गज अभिनेते अभिनेत्र्या २०१८ मध्ये जग सोडून गेले अश्यातच काल दिनांक १० एप्रिल २०१९ रोजी नवतेज हुंडाल देखील जग सोडून गेले. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुली राहत होत्या. आज मुंबई मधील जोगेश्वरी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन’ (सिंटा)च्या ट्विटर हँडलवरुन हुंडाल यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी सांगण्यात आली.

नवतेज हुंडाल यांच्या पश्चात पत्नी नीलम आणि दोन मुली आहेत, त्यांची कन्या अवंतिका हुंडाल ही ‘ये है मोहब्बते’ या प्रसिद्धी टीव्ही मालिकेत मिहिकाची व्यक्तिरेखा साकारत आहे. नवतेज हुंडाल यांनी अभिनय प्रशिक्षण शिबीरंही घेतली आहेत. संजय दत्तसोबतचा ‘खलनायक’ (१९९३), ‘तेरे मेरे सपने’ (१९९६) यासारख्या चित्रपटांसोबत ‘भारत एक खोज’ या टीव्ही शोमध्ये ते झळकले होते. अश्या या कलाकाराच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *