Breaking News
Home / कलाकार / अमिषा पटेल वर आरोप, बुडवले इतके करोड रुपये

अमिषा पटेल वर आरोप, बुडवले इतके करोड रुपये

रितिक रोशन सोबत “कहो ना प्यार है” या चित्रपटात काम करून अमिषा पटेल ने बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केले. अमिषा पटेल ने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कहो ना प्यार है, गदर, हमराज, क्या यही प्यार है असे अनेक मोठे चित्रपट आमिषाने गाजवले आहेत. अमिषाला आता चित्रपट मिळत नाहीत, तीच बॉलिवूड करिअरच जणू संपलं आहे. आमिष पटेल वर फसवणुकीचा आरोप दाखल केला गेला आहे. तीच्यवर आता दुसऱ्यांदा आरोप लागला आहे. रांची मधल्या एका फिल्म मेकर ने अमिषावर मोठी रक्कम परत न देण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अमिषा पुन्हा कायद्याच्या जाळ्यात अडकली आहे.रांची मधील फिल्म मेकर अजय कुमार ने अमीषा आणि तिचा पार्टनर कुणाल वर फसणूक आणि धोखाधडी ची केस केली आहे. रांची च्या कोर्टात हि केस सुरु आहे. अजय कुमार कडून अमीषा ने अडीच करोड रुपये घेतले होते. अमीषा ते पैसे देसी मैजिक ची मेकिंग आणि पब्लिसिटी वर लावणार होती. आमिषा या चित्रपटात एक्टिंग करणार आहे आणि स्वतः प्रोड्यूसर देखील आहे. २०१३ मध्ये हा चित्रपट बनवायला सुरुवात झाली होती. अमीषा म्हणाली होती चित्रपट प्रदर्शित होताच व्याजासह सर्व पैसे परत देईल.मिळालेल्या माहितीनुसार अजय ने पैसे मिळण्याची खूप वाट पहिली, पण चित्रपट प्रदर्शित झाला नाही आणि पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे अजय ने अमिषाकडे पैश्यांची मागणी केली तेव्हा तिने ३ करोड रुपयांचा चेक दिला मात्र चेक बाउंस झाला. त्यानंतर आमिषाने मोठ्या लोकांसोबत आपले फोटो दाखवून अजय ला धमकावले देखील. आता अजय ने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे आणि रांची मधील एका कोर्टात फाईल दाखल करून अमिषावर आरोप केले आहेत. या चित्रपटात जायेद खान, रणधीर कपूर, साहिल श्रॉफ आणि रवि किशन काम करणार होते व स्वतः अमिषा चा डबल रोल होता. यापूर्वी देखील आमिषाने एका कंपनीकडून ११ लाख रुपये घेतले होते आणि त्याबदल्यात तिला लग्नात नाचायला बोलावले होते. पैसे घेऊन आमिषा कार्यक्रमात नाचायला आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *